Monday, June 18, 2007

घट डोईवर, घट कमरेवर

घट डोईवर, घट कमरेवर
सोडी पदरा, नंदलाला, नंदलाला रे

कुणीतरी येईल, अवचित पाहील
जाता जाता, आग ही लाविल
सर्व सुखाच्या संसाराला, नंदलाला रे

हलता, हलता, घट खिंदळता
लज्जेवरती पाणी उडता
नकोच होईन मीच मला, नंदलाला रे

केलीस खोडी पूरे एवढी
जो वर हसते मनात गोडी
हसूनी तू ही हो बाजूला, नंदलाला रे

No comments: