Monday, June 18, 2007

रेशमाच्या रेघांनी,
लाल काळया धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला

नवी कोरी साडी लाख-मोलाची
भरली मी नक्षी फुल येलाची
गुंफियले राघू मोर, राघू मोर जोडीला

जात होते वाटेनं मी तोर्‍यात, मी तोर्‍यात
अवचित आला माझ्या होर्‍यात जी होर्‍यात
तुम्ही माझ्या पदराचा शेव का हो ओढीला

भीड काही ठेवा आल्या गेल्याची
मुर्वत राखा दहा डोळयाची
काय म्हनू बाई बाई, तुमच्या या खोडीला

No comments: