Monday, June 4, 2007

गणराज रंगि नाचतो

गणराज रंगि नाचतो
पायी घागर्‍या किरती रुणझुण नाद स्वर्गी पोचतो

किट पीतांबर कसून भर्जरी
बाल गजानन, नर्तनास करि
तुंदिल तनु तरि चपल साजिरी लावण्ये साजतो

नारद तुंबरु करिती गायन
करी शारदा वीणा वादन
ब्रम्हा धरितो, तालहि रंगुन मृदंग धिमी वाजतो

देवसभा घनदाट बैसली
नृत्य गायने मने हर्षली
गौरीसंगे स्वये सदाशिव शिशुकौतुक पाहतो

No comments: