हले हा नंदाघरी पाळणा
त्यात देखणा, गोजिरवाणा, हसतो गोकुळ राणा
ओठ लाल ते, डोळे चिमणे,
हास्यातून त्या फुले चांदणे
स्वरुप सुंदर लोभसवाणे, मोहून घेई मना
बोल बोबडे ते भाग्याचे,
शब्द वाटती ते वेदाचे
रुणझूणताती घुंगुरवाळे, येई धेनूना पान्हा
नंद यशोदा करीती कौतूक,
आनंदाचे अमाप ते सुख
मायपित्याविण कसे कळावे, सौख्य तयाचे कुणा
Monday, June 18, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment