गेला कुठे बाई कान्हा, कान्हा येईना
गेला कुठे माझा राजा, राजा येईना
किती बघू वाट तरी
जा ना जा ना, सखयांनो कुणी
आता धीर धरवेना
सांगा माझ्या मोहना
बोलणार ना तुला पुन्हा
नको धरु राग या क्षणा
पंचप्राण माझे बाई ओवाळूनी
आलिंगीन देही धरुनी
माझ्या हृदयीचा राणा
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment