Monday, June 18, 2007

घननिळा, लडीवाळा, झुलवू नको हिंदोळा

घननिळा, लडीवाळा,

झुलवू नको हिंदोळा


सुटली वेणी, केस मोकळे
धूळ उडाली भरले डोळे
काजळ गाली सहज ओघळे
या सार्‍याचा उद्या गोकुळी, होईल अर्थ निराळा


सांजवेळ ही आपण दोघे
अवघे संशय घेण्याजोगे
चंद्र निघे बघ झाडामागे
कालिंदीच्या तटी खेळतो, गोपसुतांचा मेळा

No comments: