Monday, May 28, 2007

अंतरीच्या गूढगर्भी

अंतरीच्या गूढगर्भी एकदा जे वाटले
ते प्रेम आता आटले सखी प्रेम आता आटले

दूर सोनेरी सुखाचे पाहीले आभास मी तू
रंगले आभाळ पूर्वी, तेच आता फाटले

एकदा ज्यातून मागे सूर संवादी निघाले
वंचनेने तोडले, ते स्नेह तंतू आटले

शेवटी मंदावलेल्या वादळी वार्‍याप्रमाणे
राहणे झाले दिवाणे, ते गीत गाणे कोठले

No comments: