धूंद मधुमती रात रे, नाथ रे
तनमन नाचे, यौवन नाचे उगवला रजनीचा नाथ रे, नाथ रे
जल लहरी या धीट धावती,
हरीत तटाचे ओठ चुंबिती
येई प्रियकरा, येई मंदिरा, अली रमले कमलात रे, नाथ रे
ये रे ये का मग दूर उभा, ही घटीकाही निसटून जायची
फुलतील लाखो तारा, परी ही रात कधी कधी ना यायची
चषक सुधेचा ओठी लावूनि, कटी भवती धरी हात रे, नाथ रे
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment