दैव जाणिले कुणी
लवांकुशाचा हलवी पाळणा, वनी वाल्मिकी मुनी
मृग सोन्याचा जगी असंभव
तरीही तयाला भूलले राघव
श्रीरामाला चकवून गेल्या, शक्ती मायाविनी
आपदमस्तक विशुद्ध सीता
पतिव्रता ती मूर्त देवता
पतितपावने तिला त्यागिली, तशात ती गर्भिणी
राजपुत्र ते नृपती उद्याचे
शिशुपण त्यांचे दीनपणाचे
रत्न कंदुका जागी हाती, मातीची खेळणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment