Wednesday, May 30, 2007

देव जरी मज कधी भेटला

देव जरी मज कधी भेटला, माग हवे ते माग म्हणाला
म्हणेन प्रभू रे माझे सारे, जीवन देई मम बाळाला

कृष्णा गोदा स्नान घालू दे,
रखुमाबाई तीट लावू दे
ज्ञानेशाची गाऊन ओवी, मुक्ताई निजवू दे तुजला

शिवरायाच्या मागेन शौर्या,
कर्णाच्या घेईन ओदार्या
ध्रुव चिलयाच्या अभंग प्रेमा, लाभू दे चिमण्या राजाला

No comments: