भस्म विलेपीत रुप साजिरे आणूनिया चिंतनी
अपर्णा तप करीते काननी
वैभव भूषीत वैकुंठेश्वर
तिच्या पित्याने योजियला वर
भोळाशंकर परि उमेच्या भरला असे लोचनी
त्रिशूल डमरु पिनाकपानी
चंद्रकला शिरी, सर्प गळयातूनी
युगायुगाचा भणंग जोगी, तोच आवडे मनी
कोमल सुंदर हिमनगदुहिता
हिमाचलावर तप आचरीता
आगीमधुनी फुल कोवळे फुलवी रात्रंदिनी
Tuesday, May 29, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment